Fri, Jun 05, 2020 04:36होमपेज › Nashik › नवरात्रौत्सवच्या पाहिल्याच दिवशी कुटुंबातील तिघांचा विद्युत झटक्याने मृत्यू

नवरात्रौत्सवच्या पाहिल्याच दिवशी कुटुंबातील तिघांचा विद्युत झटक्याने मृत्यू

Published On: Sep 29 2019 11:19AM | Last Updated: Sep 29 2019 11:33AM
सिडको : प्रतिनिधी

सिडको येथे घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकतांना विद्युत तारांचा शॉक लागून घरातील तीन जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. नवरात्र सणाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे सिडकोतील उघड्या तारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अधिक माहिती अशी की, सिडकोतील शिवपुरी चौकात शांताराम केदारे राहतात. रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असताना घरा शेजारून गेलेल्या विद्यूत तारांचा शॉक लागून सोजाबाई मोतीराम केदारे (वय ९०), सिंधुबाई शांताराम केदारे (वय ४०), नंदिनी शांताराम केदारे (वय २३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शुभम शांताराम केदारे (वय १९) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सिडकोतील या दुदैवी घटनेनंतर शहरातील विद्युत तारा भुमिगत करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी विद्युत अधिका-यांना घेराव घातला. यावेळी आ. सीमा हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे, डी.जी. सुर्यवंशी सह नगरसेवक व नागरिकांनी आंदोलन केले.