Mon, Nov 18, 2019 22:11होमपेज › Nashik › नाशिक : कांद्याने गाठला ३४०० रूपयांचा दर 

नाशिक : कांद्याने गाठला ३४०० रूपयांचा दर 

Published On: Sep 16 2019 4:29PM | Last Updated: Sep 16 2019 4:29PM

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर वाढलालासलगांव :  वार्ताहर 

राज्यासह देशातून कांद्याची मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ दिसून येत आहे. कांदा आयात, किमान निर्यात मुल्य दरात ८५० डॉलर वाढ, नाफेड मार्फत कांदा खरेदी, कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदान शून्य असे अनेक प्रयत्न करुन देखील बाजारांमध्ये कांद्याचा भाव टिकून आहे. 

येथील मुख्य बाजार समितीच्या कांदा आवारावर शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबरच्या तुलनेमध्ये कांद्याच्या सरासरी दरांमध्ये दोनशे रुपयांची उसळी दिसून आली. येथील बाजारपेठेत उन्हाळ कांद्याला कमीतकमी १५०० रुपये, सरासरी ३२०० तर जास्तीत -जास्त ३४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बाजारपेठेत कांदा भाव तेजी असल्याचा अंदाज असून भविष्यात कांदा भाव वाढल्याने उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जानकारांचे मत आहे.

दुष्काळी परिस्थितीनंतर पावसाचा लहरीपणा आणि यात कांदा पिकवणाऱ्या राज्यात झालेली अतिवृष्टी आदी कारणामुळे कांद्याची आवक कमी झाली. एकीकडे आवक कमी तर दुसरीकडे मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली होती.

शुक्रवारच्या लिलावात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीतकमी ९५१ सरासरी ३०००   र जास्तीत -जास्त ३१४२ रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले.