Fri, Jun 05, 2020 15:52
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नंदुरबारमधील पोलिस कर्मचारी बेपत्ता

नंदुरबारमधील पोलिस कर्मचारी बेपत्ता

Published On: Jul 05 2019 1:33AM | Last Updated: Jul 04 2019 7:04PM
नंदुरबार : प्रतिनिधी 

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत नुकतीच बदली झालेले पोलिस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

विश्वास रंजन वळवी (वय. ३०, रा. पोलिस लाईन, बिल्डिंग नं. २७, रूम नं. ६ पोलिस मुख्यालय, नंदुरबार) असे हरवलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. ते अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. मागील महिन्यात वळवी यांची बदली नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांची रजा टाकली. 

यानंतर ते रजा संपल्यावर दि.१ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत रुजू होण्यासाठी जात असल्याचे कुटुंबियांना सांगून ते घरातून निघून गेले होते. परंतु अद्याप ते पोलिस ठाण्यात परतलेले नाहीत. असे त्यांच्या कुटुंबियांचे सांगितले आहे. तर त्यांची पत्नी पौर्णिमा वळवी यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली आहे.