Tue, May 26, 2020 11:25होमपेज › Nashik › नंदुरबारात ४४ तापमानात शंभरी गाठलेल्या वृद्धांचे मतदान

नंदुरबारात ४४ तापमानात शंभरी गाठलेल्या वृद्धांचे मतदान

Published On: Apr 29 2019 2:25PM | Last Updated: Apr 29 2019 2:43PM
नंदुरबार : प्रतिनिधी 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा येथे शांततेत मतदान पार पडत असून ४४ अंश तापमानातही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एक वाजेपर्यंत मतदान 36.5 टक्के झाले आहे.

अक्कलकुवा मतदान केंद्रावर शंभरी गाठलेल्या एक दोन नव्हे तर चार-पाच वृद्ध मतदारांनी थेट मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यामुळे वृद्धाच्यामध्येही उत्साह दिसून येत आहे.

यामध्ये ताराचंद नेमीचंद जैन (वय १००), शिवदुलारी विश्वनाथसिंह चंदेल (वय ९६), भवरलाल जैन (वय ९३), अशी या शंभरी गाठलेल्या ज्येष्ठ मतदारांची नावे आहेत. त्यांना मतदानाचा हक्क बजावताना पाहून इतर मतदारदेखील थक्क झाले.  अक्कलकुवा शहरात सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदार उपस्थित होत आहेत. त्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक- युवतीची संख्या मोठी आहे.