Tue, May 26, 2020 10:49होमपेज › Nashik › श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्‍सवास प्रारंभ (video)

श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्‍सवास प्रारंभ (video)

Published On: Sep 29 2019 1:35PM | Last Updated: Sep 29 2019 2:01PM
सप्तशुंगगड : प्रतिनिधी   

महाराष्‍ट्रातील साडेतीन शक्‍तीपीठामध्ये आर्धे पीठ म्‍हणुन सप्तशृंगी देवीला ओळखले जाते. दरम्‍यान सप्तशृंगगडावर आजपासून शारदीय नवरात्र उत्‍सवाला प्रारंभ झाला. आज सकाळी देवी संस्‍थानच्या कार्यालयातून देवीच्या विविध अलंकारांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. 

आज सकाळी देवीला पंचामृतची स्‍नान घालून दुपारी घटस्थापना करण्यात आली. यावेळी दुपारी महाआरती करण्यात आली. यानंतर महानैवेध्य दाखवण्यात आला. यावेळेस  जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक महेन्द्र मंडल मुंबई येथील भाविक गुलशन पटेल यांच्या हस्ते महापुजा करून घटस्थापना करण्यात येऊन नवराञ उत्सवास प्रारंभ करण्यात आला. 

आज पहाटेपासून ज्‍योत घेवून येणार्‍या भाविकांची गडावर गर्दी होत आहे. तसेच भगवतीचे दर्शन करून श्रध्देने नवस  फेडण्यासाठी भाविकांची मांदियाळी गडावर जमू लागली आहे. 
भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात आले आहे. नवरात्रोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे देवीच्या गाभार्‍या घटाची स्‍थापना करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्‍या आहेत.