पंचवटी (नाशिक ) : पुढारी ऑनलाईन
तिसरी मुलगीच झाल्याने आईनेच आवळला चिमुरडीचा गळा आवळल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.
संशयित अनुजा बाळासाहेब काळे (रा.गौरीगणेश आपरमेन्ट, वृन्दावन नगर, आडगाव शिवार) या महिलेस यापूर्वी दोन मुलीच झाल्या आहेत. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी प्रसूतीनंतर पुन्हा एकदा तिसरी मुलगी झाली. यामुळे अनुजास नैराश्य आले. दरम्यान, अनुजाचे पती बाबासाहेब हरिभाऊ काळे हे (दि.३१) रोजी सकाळी ८.३० वाजता पत्नी अनुजा हिच्या मावसभावाच्या लग्नासाठी शिंगवे, कोपरगाव याठिकाणी गेले होते.
तेव्हा घरी पत्नी अनुजा, आई, मुलगी आराध्या, आयुजा, १० दिवसांची पियू असे घरी होते. दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजता बाबासाहेब काळे यांना त्यांची मुलगी आराध्याने फोन करून पियू निपचित पडली असून ती उठत नाही. आणि आई रडत असल्याने आजी पियूला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे असे सांगितले. दरम्यानच्या काळात हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने बाळासाहेब काळे यांनी मयत पियूचे शवविच्छेदन करण्याबाबत आग्रह धरला. यात देखील पियूचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब लक्षात आली.
आडगाव पोलिसांनी देखील पियूच् या आईची कसून चौकशी केली असता तिसऱ्यांदा देखील मुलगीच झाल्याने पियूचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.