Thu, Jan 28, 2021 07:17होमपेज › Nashik › माय-लेकीचा विनयभंग; कांदळकरविरोधात गुन्हा 

माय-लेकीचा विनयभंग; कांदळकरविरोधात गुन्हा 

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:00PMनाशिक : प्रतिनिधी

सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोस्को, दिंडोरी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ढकांबेजवळील गोळीबार प्रकरणातील संशयित विजय कांदळकर याच्याविरोधात आता गंगापूर पोलीस ठाण्यात माय-लेकीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गंगापूर रोडवरील काळेनगर परिसरात राहणार्‍या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर 2017 मध्ये मालेगावमधील दसाणे शिवार येथील 10 प्लॉट विक्री करण्यासाठी संशयित विजय कांदळकर याच्याकडे कागदपत्रे दिली होती. त्यानंतर 10दिवसांनी पीडितेने कांदळकरकडे कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कांदळकरने पीडितेस फोन करून गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये कागदपत्रे घेण्यासाठी बोलावले.

त्यानुसार पीडित तिच्या मुलीसह हॉटेलमध्ये गेली. तेथे गेल्यानंतर कांदळकरने कागदपत्रे न देता माय-लेकीचा विनयभंग केला. तसेच माझे कोणीच वाकडे करू शकत नाही असे म्हणून शिवीगाळ केली. दरम्यान, कांदळकर याने पीडितेचे प्लॉट स्वमालकीचे असल्याचे सांगत ते बळकावण्याचा प्रयत्न केल्याचेही पीडितेने सांगितले.