Tue, May 26, 2020 13:21होमपेज › Nashik › आ. हरिभाऊ जावळे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

आ. हरिभाऊ जावळे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

Published On: Jul 26 2019 1:49AM | Last Updated: Jul 25 2019 11:42PM
जळगाव :  प्रतिनिधी

मंत्री पदापासून हुलकावणी मिळात असलेले आ हरिभाऊ जावळे याना विधान परिषदेच्या तोंडावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी  नियुक्ती शासनाने केली आहे.त्यांना राज्यमंत्री पदाचा  आहे.जळगाव जिल्ह्य दर्जेदार केळी, कापूस आणि वांगी यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे . या कृषिप्रधान जळगाव जिल्ह्याच्या वाटेला आणखी एक बहुमान मिळाला आहे.  

जळगाव जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील संशोधन संस्थांच्या उभारणीची मागणी होतआहे. त्याला आ. हरिभाऊ जावळे यांच्या आजच्या नियुक्तीमुळे चालना मिळण्याची आशा जिल्हावासियांना आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2) (ब) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या आ. हरिभाऊ जावळे यांचा दर्जा हा कॅबिनेट मंत्रिपदाचा असणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती आहे, असे यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे.

‘लॅब टू लॅण्ड’ ही संकल्पना राबविणार

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे देवून मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करायचे आहे. यासाठी ‘लॅब टू लॅण्ड’ ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे. कारण प्रयोग शाळेतील संशोधन थेट शेतकर्‍यांच्या शेतात पोहचले तर पंतप्रधानांचे स्वप्न निश्‍चित पूर्ण होईल.