Sun, Jan 19, 2020 20:49होमपेज › Nashik › जळगाव : बेपत्ता वीट भट्टी व्यवसायिकाचा खून 

जळगाव : बेपत्ता वीट भट्टी व्यवसायिकाचा खून 

Published On: Oct 15 2018 7:42PM | Last Updated: Oct 15 2018 7:42PMजळगाव : प्रतिनिधी 

वरणगाव येथील बेपत्ता असणाऱ्या वीट भट्टी व्यवसायांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील ओकार चौधरी असे या व्यावसायिकांचे नाव आहे. यासंबंधी पोलिसांनी कोणतीही माहिती मिळू न शकल्याने उशिरा पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील सुनील चौधरी यांचा विटभट्टीचा व्यवसाय होता. काल, रविवार (दि १४) सायंकाळपासून ते बेपत्ता होते. सुनिल हे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी आज, सोमवार (दि. १५) रोजी सकाळी वरणगाव पोलिसात बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली होती.  रेल्वे स्थानकाच्या परिसरात काही मेंढपाळ बकऱ्या चारीत असताना साई नगरात त्यांना मुतदेह आढळून आला. यासंबंधीची माहिती त्यांनी पोलिसांना दिेली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनिलच्या डोक्यावर विटांचा मारा केलेला दिसत होता. तर त्याच्या हातावर चावा घेतल्याचे दिसत होते. मात्र ठाण्याच्या महिला पोलिस अधिकारी बैठकीत असल्यामुळे कारवाईला बराच वेळ लागला. यानंतर दुपारच्या सुमारास घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले. यासंबंधी पोलिस अधिक तपास करीत आहेत.