Mon, Jun 01, 2020 07:22होमपेज › Nashik › महापौरांचे रणजित पाटलांना मागण्यांचे साकडे

महापौरांचे रणजित पाटलांना मागण्यांचे साकडे

Published On: Feb 15 2018 4:25PM | Last Updated: Feb 15 2018 4:24PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेच्या विविध प्रकल्पांविषयीचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असून, त्यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशा स्वरूपाचे साकडे महापौरांसह पदाधिकार्‍यांनी नगरविकास, विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांना घातले आहे. मनपाच्या विविध योजनांचा त्यांनी गुरूवारी (दि.१५) आढावा घेतला.

याप्रसंगी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरूस्कर, आयुक्त तुकाराम मुंढे आदींसह विविध खातेप्रमुख उपस्‍थित होते. सहा व साडेसात मीटर रस्त्यावरील मिळकतधारकांना टीडीआर व प्रिमियम द्यावा, गंगापूर धरणावरील रॉ वॉटर पंपिंप स्टेशन येथे सोलर यंत्रणा निर्माण करण्यासाठी ५७ कोटी निधी मिळावा, खुल्या जागेतील धार्मिक स्‍थळांना मान्यता मिळावी, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.