Sun, Jun 07, 2020 11:47होमपेज › Nashik › धक्कादायक; मेकअप टिकत नसल्याने विवाहितेची आत्महत्या

धक्कादायक; मेकअप टिकत नसल्याने विवाहितेची आत्महत्या

Published On: Feb 14 2019 2:35PM | Last Updated: Feb 14 2019 2:31PM
नाशिक : प्रतिनिधी 

आपण छान दिसावं, चार चौघांत उठून दिसावं असं कोणाला नाही वाटत. त्‍यातल्‍या त्‍यात स्‍त्री स्‍वभावधर्मानुसार नटनं, शृंगार करणं हे ओघान आलचं. मग अनेकांकडून छान दिसण्यासाठी बरीच खटपट केली जाते, मात्र हे करत असताना आपल्‍या नैसर्गिक सौदर्याकडे आपण डोळेझाक करतो आणि वरवरच्या रंगरंगोटीला म्‍हणजेच दिसण्याला महत्‍व देतो, मग यातूनच वरवरचा खोटा चेहरा जेंव्हा काही वेळाने निघून जातो, तेंव्हा काहींचा हिरमोड होतो. मग यातूनच काही लोक इतके निराश होतात की ते आपले जीवनचं संपवितात. अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. इथल्‍या एका विवाहितेने डोळ्‍यातून वारंवार येणार्‍या पाण्यामुळे मेकअप आणि काजळ पुसले जाते यामुळे आपण सुंदर दिसत नाही म्‍हणून नैराश्य आल्‍याने आपले जीवन संपविल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, सिडकोतील दत्‍तनगर भागातील माऊली चौकात राहणाऱ्या रखमा भास्‍कर खरचान या २७ वर्षीय विवाहितेने डोळ्यातून वारंवार पाणी येत असल्याने मेकअप आणि काजळ पुसला जाते, या कारणामुळे गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे तिच्या नातेवाईकांना धक्‍का बसला आहे. रखमा हिने आत्महत्यपूर्वी एक चिट्ठी लिहली होती. यामध्ये तीने लिहिले होते की, आपले डोळे मोठे असल्याने त्यातून सारखे पाणी यायचे. यामुळे केलेला मेकअप आणि काजळ टिकत नव्हते. त्यामुळे आपण सुंदर दिसत नसल्याचे मला नैराश्य आले आहे. यातूनच तीने बुधवारी (दि.१३) राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे परिसरातील लोकांमध्ये हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. आज मानसाला चांगले असण्यापेक्षा चांगले दिसणेचं अधिक महत्‍वाचे वाटू लागल्‍याचे अशा घटनांतून समोर येत आहे. चांगले दिसण्यासाठी प्रयत्‍न करणे काही वाईट नसले तरी वरवर चांगले दिसण्याच्या प्रयत्‍नात आपले बहुमोल जीवन संपविने कितपत योग्‍य आहे हा प्रश्नच आहे. त्‍यामुळे आपल्‍या नैसर्गिक असण्याला महत्‍व द्‍यायचे की बनावटी काही काळाच्या सौदर्याच्या प्रेमात पडायचं याचा विचार करण्याची गरज आहे.