Tue, Nov 19, 2019 05:27होमपेज › Nashik › धुळ्यात नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या 

धुळ्यात नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या 

Published On: Dec 19 2017 1:07PM | Last Updated: Dec 19 2017 1:07PM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी 

साक्री तालुक्यातील धाडणे शिवारात एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. ७ महिन्यांपूर्वीच या दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र त्याला घरच्या लोकांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. 

आत्महत्येपुर्वी दोघांनी चिठ्ठी लिहिली असून यात कुणालाही दोषी धरू नये असे लिहले आहे. साक्री तालुक्यातील धाडणे फाटयावर एका वडाच्या झाडास एकाच दोरीने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सोनवणे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत असताना मृतदेहांजवळ डायरी आढळली असून यात आत्महत्या करण्याचे कारण नमुद करण्यात आले आहे. मुलाचे नाव कैलास रमेश बागुल (वय 21) असे आहे. तर मुलीचे नाव दिपाली सोमनाथ चव्हाण (वय 20) आहे. कैलास बागुल हा धाडणे गावातील रहिवासी असून दिपाली ही कळवण तालुक्यातील अभोणा येथील रहिवासी आहे. 

हे दोघे एका पोल्ट्री फार्मवर कामास असताना त्यांची ओळख झाली. यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपातंर प्रेमात होऊन मे महिन्यात त्यांनी विवाह केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या परिवारातील लोकांच्याकडून या विवाहास विरोध होत होता असे सांगण्यात येत आहे. यातून कैलास आणि दिपाली यांच्यात देखील वाद झाले होते. दोन दिवसांपुर्वी 17 डिसेंबर रोजी पिंपळनेर गावात या दोघांची पुन्हा भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात समझौताही झाला. मात्र त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधे कैलासने त्याच्या वडिलांची माफी मागितली आहे. वडीलांबरोबर भांडण झाले होते. पण आता परीवाराकडे लक्ष देण्याची विनंती त्याने त्यात केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने धाडणे येथे त्याच्या मावशीला फोन करून धाडणे येथे येत असल्याची माहीती दिली होती. पण तो पोहोचला नसल्याने परिवार त्याची वाट पहात होते. पण त्यापुर्वीच त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्याने परीवारावर शोककळा पसरली आहे. या चिठ्ठीमधे आत्महत्येसाठी कुणासही देाषी धरू नये असे नमुद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.