Fri, May 29, 2020 09:27होमपेज › Nashik › राम मंदिरावरून पीएम मोदींचा नाशकातून शिवसेनेला खोचक टोमणा

पीएम मोदींचा शिवसेनेला खोचक टोमणा

Published On: Sep 19 2019 3:14PM | Last Updated: Sep 19 2019 4:02PM

पंतप्रधान नरेंद्र मोदीनाशिक : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (ता.१९) नाशकातून राम मंदिर प्रश्नावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला. राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. तरीही याबाबत वक्तव्ये करणारे बडबोले कुठून टपकत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

न्यायप्रणालीवर विश्वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. ते नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात राम मंदिराच्या मुद्यावर भर दिला.

राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यासाठी न्यायालयावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही लोक राम मंदिरासंबंधी नको ती वक्तव्य करत आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सुप्रीम कोर्टाचा सन्मान करणे आवश्यक आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना याबाबत वक्तव्य करणारे बडबोले कुठून येत आहेत. या सर्व प्रकरणात अडथळा केला जात आहे. राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.  

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्याला हात घातला आहे. राम मंदिराची पहिली वीट शिवसेनाच रचणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लीच म्हटले होते. काश्मीर प्रश्नी सरकारने जसा तातडीने निर्णय घेतला त्या प्रमाणे राम मंदिराचा धाडसी निर्णय सरकारने घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आता त्यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींना समाचार घेतला आहे.