Fri, May 29, 2020 08:50होमपेज › Nashik › पूर्ण बहुमत नसतानाही सीएम फडणवीसांनी स्थिर सरकार चालवलं!; पीएम मोदी (video)

पूर्ण बहुमत नसतानाही सीएम फडणवीसांनी स्थिर सरकार चालवलं!; पीएम मोदी (video)

Published On: Sep 19 2019 2:35PM | Last Updated: Sep 19 2019 2:35PM

पंतप्रधान नरेंद्र मोदीनाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेचा समारोप आज (ता.१९) नाशकातून होत आहे. या समारोपासाठी  तसेच आगामी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे २०१४ मध्येही भाजपने नाशकातून विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. 

पीएम मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नाशिकच्या पावनभूमीला नमन करत मोदी यांनी  भाषणाची सुरूवात मराठीतून केली. नाशिकच्या पावन, धर्मभूमीला नमस्कार असे पीएम मोदी म्हणाले. उदयन राजे यांनी पगडी घातली हा जीवनातील बहुमोल क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल उतरदायित्व आहे असे मोदी यांनी नमूद केले. 

पीएम मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख उर्जावान असा केला. मुख्यमंत्र्यांचे जोरदार कौतुक पीएम मोदींनी केले. ते म्हणाले, पूर्ण बहुमत नसतानाही त्यांनी सरकार चालवून दाखवले. मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे. चार हजार किमीच्या यात्रेत कोट्यवधी लोकांनी आशीर्वाद दिला आहे असे मोदी म्हणाले. 

या जाहीर सभेसाठी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले तसेच जय कुमार रावल, सुभाष भामरे, सुधीर मुनगंटीवार तसेच एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील, रक्षा खडसे, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानशी आदी उपस्थित आहेत.