Tue, Oct 22, 2019 19:37होमपेज › Nashik › जळगाव : रावेर येथून २९ लाखांची रोकड जप्त

जळगाव : रावेर येथून २९ लाखांची रोकड जप्त

Last Updated: Oct 09 2019 6:28PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : प्रतिनिधी 

रावेर येथील चोरवड चेक पोस्ट नाक्यावर आज दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेश परिवहन बस मधून 29 लाख 15 हजाराची रोकड जप्त करण्यात आली.

मध्य प्रदेश परिवहन मंडळाची बस (एमएच-09 -एचए-3775) बस बऱ्हाणपूरवरून रावेरला येत असताना चोरवड चेक नाक्यावर विशेष पथक नेहमी प्रमाणे तपासणी करीत असताना मोहम्मद इलियास मोहम्मद इकबाल या व्यक्तीकडे 29 लाख 15 हजाराची रोकड मिळून आली. याठिकाणी पथक प्रमुख एन. आर. तडवी हे होते.

दरम्यान, पथकाकडून पंचनामा करण्यात आला असून खडवा येथील एका व्यापाऱ्याची रोकड असल्याचे सांगितले आहे. ती व्यक्ती कागदपत्रे घेऊन येत असयाचर समजते आहे