Fri, Apr 23, 2021 12:48
नाशिकमध्ये आज मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन, दुकाने, आस्थापनांसाठी ७ ची वेळ तर सुट्टीच्या दिवशी धार्मिकस्थळे बंद

Last Updated: Mar 09 2021 3:21PM

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हात मंगळवारी (दि.९) मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवावगळता अन्य सर्व आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक, निफाड, मालेगाव व नांदगाव या तालुक्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामूळे प्रशासनाने यापूर्वीच निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत दिले होते. त्यानूसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अंक्षत: लॉकडाऊनबाबतचे आदेश काढले आहेत.

काढण्यात आलेल्या आदेशानुसार,  सकाळी सात ते सायंकाळी ७ पर्यंत दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मेडीकल, दुध, भाजीपाला, किराणा, वृत्तपत्र वितरण, जनावरांशीनिगडीतन जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील दुकानेवगळून इतर सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी पुर्णत: बंद राहतील.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीतील शाळा-महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. तर दहावी-बारावीचे वर्ग सुरू ठेवताना, त्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पूर्वघोषित स्पर्धा परीक्षा नियोजित वेळेनुसार होतील. वीकएंडला सर्व धार्मिकस्थळे बंद राहतील. जिम, मैदाने, जलतरण तलाव केवळ व्यक्तिगत सरावासाठी खुले राहतील. स्पर्धा आणि गर्दीस तेथे परवानगी देण्यात आलेली नाही.

 विवाहसोहळ्यांवर बंध 

जिल्ह्यात धार्मिक, राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व आठवडे बाजार बंद राहतील. हॉटेल आणि बार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुले ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. १५ मार्चपर्यंतचे पुर्वनियोजीत विवाहसोहळे हे पोलीस व स्थानिक यंत्रणांच्या समंतीने पार पडतील. त्यानंतर मात्र, लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल व इतर ठिकाणी विवाह सोहळ्यांना बंदी घालण्यात आली आहे.