Mon, Aug 10, 2020 08:25होमपेज › Nashik › नाशकात दाट वस्तीत बिबट्याचा हल्ला (video)

नाशकात दाट वस्तीत बिबट्याचा हल्ला (video)

Last Updated: May 30 2020 9:54AM
इंदिरानगर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

इंदिरानगर परिसरातील राजसारथी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बिबट्याने प्रवेश करत दोघांना जखमी केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रहिवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर काही वेळेतच वन विभागाचे रिस्की पथक व इंद्रानगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान परिसरात बिबट्या आला आहे, या घटनेने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण  निर्माण झाले.

वाचा - नाशिक : महासभा चालली तब्बल सहा तास !

वन विभागाच्या पथकाकडून संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. राज सारथी सोसायटीमधील बी-१२ विंगमध्ये बिबट्या सर्वप्रथम शिरला. येथे जिन्यामध्ये बिबट्याने सूपडु लक्ष्मण आहेर (वय ६६) या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जिन्यावरून खाली आला आणि सोसायटीच्या रस्त्यावरून पुढे जात राजेंद्र निवृत्ती जाधव (वय ५५) यांच्यावर हल्ला चढविला. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आहेर हे गंभीर जखमी झाले आहेत तर दुसऱ्या व्यक्तीला  किरकोळ जखम झाली आहे. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हा बिबट्या काल कॉलेज रोडवर हल्ला करून तो रात्री मुंबई नाका परिसरात आढळून आला. तो इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक मार्गाने इंदिरानगर परिसरात घुसून तो वडाळागावालगत असलेल्या नाल्यातून पुढे मिलिट्रीच्या परिसरात धूम ठोकली.