Thu, Nov 14, 2019 17:41होमपेज › Nashik › नाशिक : कोनांबे धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांमध्ये समाधान

नाशिक : कोनांबे धरण ओव्हरफ्लो

Published On: Jul 28 2019 5:12PM | Last Updated: Jul 28 2019 5:12PM
सिन्नर : प्रतिनिधी

तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील कोनांबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने आज (ता.28) पहाटे 4 वाजता धरणावरील सांडवा ओसंडून वाहू लागला. देवनदी प्रवाही झाली. नदीला पाणी आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्‍चिम पट्ट्यातील डोंगररांगामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यात बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले. यानंतर आता कोनांबे धरणही तुडूंब भरल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  

कोनांबे पूरचारीचे बर्‍याच वर्षांपासून दुर्लक्षित, रेंगाळलेले काम आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. या पूरचारीत पाणी सोडण्याची मागणी लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांकडून होणार असून पूरचारीला पाणी मिळाले तर सोनांबे, सोनारी, जयप्रकाशनगर, डुबेरे, आटकवडे, पाटोळे, मनेगाव या गावांच्या 1 हजार हेक्टरवरील क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना देखील संजीवनी मिळाली आहे.