Wed, Jun 03, 2020 08:35होमपेज › Nashik › जुने नाशिकमधील वाडा कोसळला

जुने नाशिकमधील वाडा कोसळला

Published On: Jul 07 2019 10:38PM | Last Updated: Jul 07 2019 10:38PM
नाशिक : प्रतिनिधी

जुने नाशिक परिसरातील अमरधाम रोडवरील भोई गल्लीतील कांबळेवाड्याचा एक भाग रविवारी (दि.7) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संततधार पावसाने कोसळला. र्दुघटनेपुर्वीच वाड्यातील रहिवाशांनी स्थंलातर केल्याने पुढील अनर्थ टळला.  

बागवानपुरा-कथडा अमरधाम रस्त्यावरील भाई गल्लीमधील विक्रांत कांबळे यांचा दुमजली वाडा आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वाडा पुर्णत: भिजला होता. रविवारी सकाळापासून वाडा हलत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे जवान शाम राऊत व नाना गांगुर्डे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह वाड्याची पाहणी करून कांबळे यांच्यासह तीन कुटूंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. 

स्थानिक रहिवाशी वाड्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर काही क्षणातच वाड्याचा भाग कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे अनर्थ टळला. त्यामुळे मनपासह स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.