Fri, Jun 05, 2020 14:05होमपेज › Nashik › नराधम बापाकडूनच तीन वर्षे मुलीवर अत्‍याचार 

नराधम बापाकडूनच तीन वर्षे मुलीवर अत्‍याचार 

Published On: Mar 30 2019 7:37PM | Last Updated: Mar 30 2019 7:53PM
जळगाव : प्रतिनिधी 

येथील एमआयडीसी भागातील एमएसीबी कॉलनीत राहणाऱ्या बापाने आपल्या सख्या मुलीवर गेल्या चार वर्षांपासून बलात्कार करत असल्याचे  धक्कादायक वास्‍तव समोर आले आहे. या घटनेविरोधात पीडित अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने, नराधम बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरण कंपनीत वाहनचालक असलेल्या सुभाष चिंतामण सोनवणे याने आपल्या पोटच्या मुलीवर २०१६ ते २०१९ या या काळात बलात्कार केला. आई घरातून बाहेर गेल्यानंतर मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन हा नराधम बाप मुलीवर वेळोवेळी बलात्कार करत होता. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.