Wed, Jan 20, 2021 00:06होमपेज › Nashik › जळगाव : कोरोना बधितांची संख्या झाली ५०१ 

जळगाव : कोरोना बधितांची संख्या झाली ५०१ 

Last Updated: May 27 2020 9:50AM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील भडगाव, पारोळा, धरणगाव येथील ४७ अहवाल प्राप्त झाले असून ४५ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये वडजी-भडगाव येथील एक तर धरणगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५०१ झाली.

आज सकाळी आलेल्या पहिल्या अहवालात भडगाव येथे ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. जळगाव रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या ६४ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. 

यापैकी ५७ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर ७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४९९ इतकी झाली होती.