होमपेज › Nashik › जळगाव :आ. राजूमामा भोळेंच्या दुचाकीला अपघात

जळगाव :आ. राजूमामा भोळेंच्या दुचाकीला अपघात

Published On: Sep 12 2019 2:53PM | Last Updated: Sep 12 2019 8:44PM

जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला अपघात झालाजळगाव : पुढारी ऑनलाईन

जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकीवरून रिंगरोडने जात असताना समोरून आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून ते पडले. रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन ते बाहेर पडले असून त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. 

आमदार भोळे हे नेहमी दुचाकीने शहरात फेरफटका मारत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी दुचाकीने रिंगरोड मार्गाने सकाळी जात होते. रिंगरोडवर अमृत योजनेचे काम सुरू असल्याने एका चौकात एकाच बाजूचा मार्ग सुरू आहे. अचानक गल्लीतून चारचाकी आल्याने आ.भोळे यांनी दुचाकीचा तात्काळ ब्रेक मारला. त्यामुळे दुचाकी घसरून ते खाली कोसळले. अपघातात आ.भोळे यांना इजा झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर आ.भोळे बाहेर पडले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.