Tue, Aug 04, 2020 14:31होमपेज › Nashik › जळगाव : साखळी तुटेना, जिल्हाधिकारी मैदानात

जळगाव : साखळी तुटेना, जिल्हाधिकारी मैदानात

Last Updated: Jul 11 2020 6:30PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील कोरोना रुग्णाची संख्या काही केल्या कमी होत नसल्याने शहरात महापालिकेतर्फे रुग्णशोध मोहीम सुरू केली आहे. प्रशासनाकडून शोध मोहिमेला नागरिकाचा कसा प्रतिसाद मिळतो तसेच या मोहिमेत काय तपासण्या करण्यात येत आहे याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाहणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे स्वतः नागरिकांच्या घरी पोहोचले. तपासणी करणाऱ्या पथकाबरोबर आपल्या दारी जिल्हाधिकारी आल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला.

अधिक वाचा : जळगाव : १० वर्षीय मुलीवर अत्‍याचार करणाऱ्या नराधमाला बेड्या 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गिरणा टाकी परिसरातील नवीन पोस्टल कॉलनी परिसरात सर्वेक्षण टीम सोबत सहभागी होऊन पाहणी केली. रुग्णशोध मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन प्रामुख्याने तापमापक यंत्राने ताप मोजणे, ऑक्सिमिटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी, पल्स रेट मोजणे, तसेच इतर आजार (मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग) याची नोंद केली जात आहे. 

अधिक वाचा : जळगाव : तीन चोरट्यांकडून २४ मोटारसायकली जप्त

जळगाव शहरातील दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महापालिका व जिल्हा प्रशासनाने शहरातील काही सामाजिक संस्था व संघटनांना आवाहन करून ‘रुग्णशोध मोहीम’ हाती घेतली आहे. यात संपूर्ण शहरातील प्रभाग निहाय विविध संस्थांची योजना केली आहे. यानुसार त्या त्या प्रभागात अन्य संस्थांप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील या मोहिमेत प्रशासना सोबत सर्वेक्षण करीत आहेत. 

दररोज १०० घरांचे सर्वेक्षण 

एका टीम मध्ये एक महापालिका शिक्षक व दोन स्वयंसेवक असे तीन जण आहेत. या प्रमाणे शहरातील ५० भागांत १०० व राष्ट्रीय स्वयंसेवक सर्वेक्षण करीत आहेत. प्रत्येक टीम रोज १०० घरांचे सर्वेक्षण करणार आहे. स्वयंसेवकांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट, फेसशील्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.