Tue, May 26, 2020 11:20होमपेज › Nashik › नाशिक : 'हेल्मेटसक्तीपेक्षा घरफोड्यांवर लक्ष द्या' : विश्वास नांगरे पाटील यांना सल्ला

नाशिक : 'हेल्मेटसक्तीपेक्षा घरफोड्यांवर लक्ष द्या' : विश्वास नांगरे पाटील यांना सल्ला

Published On: May 13 2019 1:19PM | Last Updated: May 13 2019 1:32PM
नाशिक : पुढारी ऑनलाईन 

नाशिकमध्ये आजपासून (ता.१३) हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, हेल्मेटसक्तीला संपूर्ण जिल्ह्यातून विरोध होत आहे. हेल्मेटसक्तीविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. 

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा शहरातील घरफोड्यांवर लक्ष केंद्रीत करा, अशी मागणी काहीनी केली. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेची घोषणा केली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू असली, तरी आता या मोहिमेला व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारपासून वाहतूक पोलिसांसह अन्य पोलीस कर्मचारीही कारवाईसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

 नियमभंग केल्यास थेट वाहन जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरात 26 ठिकाणी झिकझॅक पद्धतीने नाकाबंदी करून बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. दररोज आवश्यकतेनुसार नाकाबंदीची ठिकाणे बदलण्याची शक्यता आहे.