Mon, Nov 30, 2020 13:55होमपेज › Nashik › नाशकात ४ जानेवारीपर्यंत शाळा बंद : छगन भुजबळ

नाशकात ४ जानेवारीपर्यंत शाळा बंद : छगन भुजबळ

Last Updated: Nov 22 2020 1:09PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये ४ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले मुंबई व पुणे जिल्ह्यात शाळा सुरू न करण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱयांसोबत आज चर्चा केली. त्यावर ४ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ शाळा सुरू होणार होत्या त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी केल्या शिवाय शाळेत नो एन्ट्री असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.