Fri, Jun 05, 2020 15:41
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › काँग्रेसच्‍या धुळ्‍यातील सभेला सुरुवात

काँग्रेसच्‍या धुळ्‍यातील सभेला सुरुवात

Published On: Mar 01 2019 3:10PM | Last Updated: Mar 01 2019 3:10PM
धुळे :  प्रतिनिधी

धुळ्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची आज (ता.१) शुक्रवारी सभा होणार आहे. या सभेची  जय्यत तयारी झाली आहे. या सभा मंचावर डॉ. उल्हास पाटील , आमदार कांशीराम पावरा, माजी मंत्री हेमंत देशमुख, शोभाताई बच्छाव, तुषार शेवाळे उपस्‍थित आहेत. राहुल गांधी  धुळ्‍यात पाोहचले आहेत. 

राहुल गांधी यांच्‍या भाषणाआधी डॉ. उल्हास पाटील यांचे भाषण झाले. या भाषणात डॉ. उल्हास पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर व मंत्री  गिरीश महाजन तुम्‍हची जादू चालणार नाही अशी टीका केली. तसेच यावेळीपंतप्रधान राहुल गांधीच होतील असा दावा देखील डॉ. उल्हास पाटील यांनी केला.  

नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी आजची सभा ऐतिहासिक असल्याचे सांगितले आहे. मैदानाचा इतिहास सांगितला. नोटबंदीने जनता हैराण झाली. रांगेत लोक शाहिद झाले. भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला गेली. कर्ज बुडव्यांना मोदी सरकारने पाठीशी घातल्‍याचे शेवाळे यावेळी म्‍हटले. काँग्रेसचे धुळे व नंदुरबार हे बाले किल्ले पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकसंघ राहा, असे आवाहन देखील त्‍यांनी केले.