Fri, Jun 05, 2020 17:29
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › पतीकडून पत्‍नीचा गळा आवळून खून 

नाशिक :पतीकडून पत्‍नीचा गळा आवळून खून 

Published On: May 09 2018 7:20PM | Last Updated: May 09 2018 7:20PMजळगाव (जि. नाशिक) : प्रतिनिधी

पतीने पत्‍नीचा गळा आवळून खून केल्‍याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी बोदवड शहरात घडली. या घटनेने बोदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. शमानाबी असलम शेख (वय, 32) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती असलम शेख हा भूसावळ पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. 

असलम हा मजुरीचे काम करतो, पती-पत्नीमध्ये नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून खटके उडत असत. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरोपी पती असलमने पत्नीशी भांडण करीत तिचा गळा आवळून खून केला व तो दुपारपर्यंत भुसावळमध्येच  भटकत राहिला आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात जावून आपल्‍या कृत्याची माहिती दिली. 

दरम्‍यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक सतीश भामरे व सहकाऱ्यांनी भेट दिली आहे. 

Tags :  nashik jalgaon, husband, wife