Tue, May 26, 2020 11:36होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले 3 हजार मतदार

नाशिक जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले 3 हजार मतदार

Published On: Feb 25 2019 12:59AM | Last Updated: Feb 25 2019 12:59AM
नाशिक : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. यंदाच्या 17 व्या लोकसभेसाठी जिल्ह्यातील शंभरी ओलांडलेले 3 हजार 8 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात वयाची 100 पूर्ण केलेले सर्वाधिक म्हणजेच 296 मतदार आहेत. दुसरीकडे 20 ते 29 वयोेगटातील मतदारांची संख्या 7 लाख 90 हजार 3 इतकी आहे.

जिल्ह्यात 44 लाख 38 हजार 78 मतदारसंख्या आहे. यामध्ये 20 ते 29 वयोगटातील 7 लाख 90 हजार 3, तसेच 30 ते 39 वयोगटातील मतदारांची संख्या 10 लाख 74 हजार 925 इतकी आहे. पंधराही विधानसभा मतदारसंघात वयाची 90 पार केलेल्या मतदारांची संख्या 20 हजार 553 आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असे सर्वाधिक 1 हजार 953 मतदार आहेत. सिन्नरमध्ये 1 हजार 799 तर येवल्यात अशा मतदारांची संख्या 1 हजार 794 आहे तर सर्वात कमी संख्या नाशिक पश्चिम मतदारसंघात 769 इतकी आहे.

वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्याही काही कमी नसून 3 हजार 8 मतदार आहेत. नाशिक मध्य मतदारसंघामध्येही शंभरी पार केलेले 279 मतदार आहेत.  नाशिक पूर्वमध्ये 266 तर मालेगाव बाह्य मतदारसंघात हीच संख्या 258 असल्याचे आढळून आले आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 108 मतदार आहे. 

शंभरी पार केलेले मतदार 

नांदगाव : 240, मालेगाव मध्य : 296, मालेगाव बाह्य : 258, बागलाण : 185, कळवण : 131, चांदवड : 172, येवला : 231, सिन्नर : 206, निफाड : 150, दिंडोरी     : 112

शंभरी ओलांडलेले 3 हजार मतदार

नाशिक पूर्व : 266, नाशिक मध्य : 279, नाशिक पश्चिम : 197, देवळाली : 177, इगतपुरी : 108, एकूण : 3008. 

सर्व्हिस व्होटर 7718 : निवडणूक शाखेने घेतलेल्या गतवर्षी घेतलेल्या विशेष मतदार नोंदणी पुनर्रीक्षण मोहिमेत जिल्ह्यातील सर्व्हिस व्होटरमध्ये 700 ने वाढ झाली आहे. ही संख्या 7718 वर पोहचली आहे. या मतदारांना मतदान प्रक्रियेवेळी पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे. नांदगावमध्ये सर्वाधिक 1185 सर्व्हिस व्होटर असून त्याखालोखाल 1236 मतदार सिन्नर मतदारसंघात आहेत. नाशिक शहरातील चार मतदारसंघ मिळून एकूण 1163 मतदार आहेत.