Tue, Jun 02, 2020 23:32होमपेज › Nashik › धुळे : पांझरा नदीला महापूर

धुळे : पांझरा नदीला महापूर

Published On: Aug 05 2019 11:08AM | Last Updated: Aug 05 2019 11:07AM
धुळे : पुढारी ऑनलाईन 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी सायंकाळी अक्कलपाडा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर धरणातून प्रतिसेकंद ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून त्यामुळे पांझरा नदीला महापूर आला आहे. ही पूर परिस्थीती तब्बल ३५ वर्षांनंतर आली आहे. १९६९नंतर पांझरेने प्रथमच असे रौद्ररूप धारण केले आहे. 

दरम्यान, पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज, सोमवारी शाळा, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. सावरकर पुतळ्याजवळील लहान पुलावरील पथदिवे अर्धे पुराच्या पाण्याखाली गेले. तर, चौपाटीही पाण्याखाली गेली. शहरातील पाच पुलांवरून पाणी वाहत आहे. गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात प्रथम पांझरेला महापूर आल्याचे जाणकार सांगत आहेत.