Mon, Nov 18, 2019 21:24होमपेज › Nashik › लाचेच्या मागणी पकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल 

लाच प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा

Published On: Dec 21 2018 5:44PM | Last Updated: Dec 21 2018 5:52PM
जळगाव : प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील गंगापुरी माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने मटण पुरवठ्याचे बिल बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केल्या प्रकरणी यावल पोलिसात मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम सोनू सोनवणे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापकावरच गुन्हा दाखल झाल्याने शाळेत एकच खळबळ उडाली. 

संबंधित तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत मटण पुरवठ्याचे काम करतो. सदर मटण पुरवठ्याचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी मुख्याध्यापक सोनवणे यांनी लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या विरुद्ध यावल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी.एम. ठाकुर यांच्या मार्गदर्शन ही कारवाई करण्यात आली.