होमपेज › Nashik › कथित गोल्डन बाबा बडोद्यात पकडला

कथित गोल्डन बाबा बडोद्यात पकडला

Published On: Oct 09 2018 9:44PM | Last Updated: Oct 09 2018 9:44PMनाशिक : प्रतिनिधी

कारमधून विवस्त्र फिरत, स्वत:ला गोल्डन बाबा म्हणवून घेत वृद्ध नागरिकांकडील दागिने लुटणाऱ्या भोंदूबाबासह तिघांना नाशिकच्या गुन्हेशाखेच्या पथकाने बडोद्यातून अटक केली. संशयितांकडून लुटीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी चाळीसगाव, औरंगाबाद येथेही अनेकांना लुटल्याचे उघडकीस आले आहे. 

रविवारी (दि.७) म्हसरुळ आणि गंगापूर पोलिस हद्दीत संशयितांनी दोघांना लुटले होते. आशीर्वाद देण्याच्या आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लुटले. गुन्हे दाखल झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून कारची माहिती हाती लागली. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने संशयितांचा पाठलाग सुरू केला. संशयित चाळीसगाव मार्गे औरंगाबाद आणि बडोद्याकडे गेले होते. वाटेत संशयितांनी चाळीसगाव आणि औरंगाबादमध्येही लुट केल्याचे समोर आले. तर गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांच्याही आधी बडोदा गाठले आणि ते त्याठिकाणी येताच भोंदूबाबासह चौघांना अटक केली.