Sat, Nov 16, 2019 06:45



होमपेज › Nashik › गोदावरी नदीच्या पुरामुळे गावांचा संपर्क तुटला

गोदावरी नदीच्या पुरामुळे गावांचा संपर्क तुटला

Published On: Jul 31 2019 11:08AM | Last Updated: Jul 31 2019 1:17PM




चेहेडी (नाशिक) : वार्ताहर 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये  गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मंगळवारी गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने एकलहरे व ओढ्याला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला.

एकलहरे-ओढा ला जोडनारा रस्ता गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेल्याने ओढा, एकलहरे, शिलापूर, लाखलगाव, चितेगाव फाटा आदी भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. नाशिकरोडला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने शेतकरी व कामगारांचा या रस्त्याने राबता असतो. 

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात परंतु मंगळवारी व बुधवारी पूर परिस्थिती मुळे अनेकांना माघारी परतावे लागले. गेल्या १५ वर्षांपासूनची या ठिकाणी पूल व्हावा ही ओढा व एकलहरे नागरिकांची मागणी आहे. २००८ मध्ये आलेल्या पुरामुळे येथील गोदा पात्रावरील रस्त्यातील फरशी वाहून गेली होती.