Tue, Jun 02, 2020 14:32होमपेज › Nashik › नाशिक : सातपूर खून प्रकरणी २४ तासात चौघांना अटक

नाशिक : सातपूर खूनप्रकरणी २४ तासात चौघांना अटक

Published On: May 22 2018 9:10PM | Last Updated: May 22 2018 9:11PMसातपूर : पुढारी ऑनलाईन

महादेववाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी २७ वर्षीय युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी २४ तासाच्या आत चौघांना शिर्डीतून अटक केली आहे. संशयित आरोपी  सुनील उर्फ काळ्या अशोक गांगुर्डे (वय २२, रा.महादेववाडी),  प्रमोद डांगरे (वय २६, रा.महादेववाडी), सुधीर भालेराव (वय २०, रा..श्रमिकनगर) व मुकेश मगर (वय १९ रा. जाधवलंकुल अशोकनगर) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

हर्षल वंसत साळुंखे (वय २७ रा.पाथर्डी फाटा, नाशिक) असे मयत युवकाचे नाव आहे. हर्षल व संशयीत चौघे हे दि. १९ मे रोजी राञीच्या सुमारास सातपूर येथील कुमारा बार या हॉटेलात दारु पिण्यासाठी बसले होते. या दरम्यान सदर ठिकाणी अज्ञात कारणावरून वाद झाला. त्यामुळे हर्षल साळुंखे यास सोबत असलेल्या चौघांनी महादेव वाडी येथील बंद पडलेल्या शिवम टॉकीज येथे आणले. त्याठिकाणी हर्षलला जबर मारहाण करत चौघेही फरार झाले. यात हर्षलचा सोमवारी पहाटे (२१ मे) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मयत हर्षलचा मित्र मृणाल घोडके यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार सातपूर पोलिस ठाण्यात भा.द.वि ३०२ प्राणघातक हल्ला करून हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, आज अटक केलेल्या चौघांना घटनास्थळी नेण्यात आले. याठिकाणी चौघांनी प्रात्यक्षिक करुन दाखवले. 

डोक्यात बिअर बाटली फोडून युवकाचा खून 

हर्षल व चौघे आरोपी हे मिञ होते. राञी बिअरबारमध्ये चौघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. बंद पडलेल्या शिवम टॉकीज येथे आणून हर्षलचा डोक्यात बिअरची बाटली फोडली. बाटलीचा घाव वर्मी लागल्याने त्यात हर्षलचा मृत्यू झाल्याची कबुली चौघांनी पोलिसांना दिली.