सप्तश्रृंगी गड (नाशिक) : प्रतिनिधी
सप्तशृंगीगडावरील शिखरावर ध्वज लावण्याची ५०० वर्षांची पंरपरा अघापही कायम आहे. दरवर्षी प्रमाणे अश्र्विन नवमीस देवीच्या शिखरावर मध्यरात्री ध्वज लावले जाते. परंपरेनुसार आज मध्यरात्री १२ च्या सुमारास हा ध्वज फडकला जाणार आहे.
सप्तशृंगीगडावरील शिखर हे समुद्रसपाटीपासून ५ हजार मीटर उंच असून या अवघड शिखरावर ध्वज लावण्यासाठी पंरपरा येथे कामय आहे. दरेगाव येथील आदिवासी समाजाचे गवळी परिवाराकडे हा ध्वज लावण्याचा मान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा अद्भूत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत आहे. या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही, सरळ शिखरावर जाणे म्हणेज मृत्युला आंमत्रण देण्यासारखे आहे. पण, कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून गवळी कुटुंब पार पाडत आहे. हा सोहळा पाहणे म्हणेज डोळयाचे पारणे फेडणारा सोहळा असतो.
ध्वजारोहणासाठी मध्यरात्री १२ वाजता शिखराव जावे लागते. ध्वजपूजेसाठी १० फूट लांब काठी आणि ११ मीटर लांब केशरी कापडचा ध्वज व पूजेसाहित्य वरती घेऊन जावे लागते. पूजेच्या साहित्यामध्ये गहू, तांदूळ, कुंकू, हळद तसेच तेथील विविध देवतांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि नेवैद्य घेऊन जावे लागते. जिथे साधा माणूस जाणे अवघड तेथे हे सर्व साहित्य घेऊन जीवाची बाजी लावत शिखरावर जावे लागते. हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह खान्देशातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात.