Sat, Jul 04, 2020 07:42होमपेज › Nashik › जळगाव : दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोरोनाचा शिरकाव 

जळगाव : दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोरोनाचा शिरकाव 

Last Updated: May 25 2020 7:37PM

file photoजळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मात्र आज प्राप्त  झालेल्या अहवालामध्ये दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला. यामुळे  मोठी खळबळ उडाली. याठिकाणी हजारो कामगार काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात याचा फैलाव रोखण्याचे प्रशासन समोर एक आव्हान आहे.

जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 5 व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
 पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ कॉलनी, गांधीनगर व दिपनगरातील आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.