Sun, Jun 07, 2020 11:23होमपेज › Nashik › धुळे जिल्ह्यात अग्नितांडव सुरूच; शिरपूरमध्ये रसायन कंपनीला आग  

धुळ्यात अग्नितांडव सुरूच; शिरपूरमध्ये आग  

Published On: Sep 03 2019 9:56AM | Last Updated: Sep 03 2019 12:27PM
धुळे : प्रतिनिधी  

धुळे जिल्ह्यात अग्नितांडवच्या घटना सुरूच आहे. शिरपूर येथील रसायन कंपनीच्या आगीनंतर आता रात्री उशिरा दोंडाईचा येथील के. एस. कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागली. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नसून यात जीवितहानी झाली नही. जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. या आगीवर नियंत्रण करण्यासाठी धुळे, शिरपूर व अन्य जिल्ह्यातील अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. पहाटेपर्यंत ही आग धुमसत होती. 

शिरपूर येथील रसायन कंपनीच्या आग लागलेली इमारत 5 मजली असून यात मोठया प्रमाणावर भुसार माल भरलेला असल्याने आगीने भीषण रूप घेतले. इमारतीच्या उंचीमुळे फायर फायटरचे पाणी मारण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. आगीची माहिती मिळाल्याने राज्याचे मंत्री जयकुमार रावळ यांनी मुंबई येथून भ्रमणध्वनी वरून संपर्क करून कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाजाची ही क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली. त्यामुळे अनेक तरुण घटनास्थळी पोहोचले. 

पण आगीचे स्वरूप पाहता व घटनास्थळी अंधार असल्याने या तरुणांना इमारती जवळ जाण्याऐवजी अग्निशमन दलास मदत करण्याचे सुचवण्यात आले. या आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे.