Tue, May 26, 2020 11:16होमपेज › Nashik › पतंगराव कदमांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन 

पतंगराव कदमांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन 

Published On: Mar 20 2018 2:56PM | Last Updated: Mar 20 2018 2:55PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पंतगराव कदम यांच्या अस्थींचे आज (मंगळवार, २० मार्च) सकाळी येथील रामकुंडात विसर्जन करण्यात आले. कदम यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम यांनी विधीवत पूजा करुन अस्थी रामकुंडात विसर्जित केल्या. या वेळी पतंगराव कदम यांचे बंधू शिवाजीराव कदम यांच्यासह संपूर्ण कदम परिवार उपस्थित होता.

गेल्या ९ मार्च रोजी पतंगराव कदम यांचे मुंबईत रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते. राजकारणातील अजात शत्रू म्हणून पतंगराव कदम हे महाराष्ट्राला परिचीत होते. आज, सकाळी परिवारातर्फे कदम यांच्या अस्थी कलश रामकुंडावर नेण्यात आला. 

या वेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. माजी मंत्री शोभाताई बच्छाव, आमदार डॉ. अपूर्व हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार अनिल आहेर, शिरीष कोतवाल, डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेवक शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र मोगल, भगीरथ्लृ शिंदे, उध्दव पवार, बबलू खैरे,आदींसह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags : dr. patangrao kadam, Bharti Vidyapith, Bharti University, Congress, cremation, nashik news, nashik ramkund