Tue, Nov 12, 2019 09:10



होमपेज › Nashik › नात्‍याला काळीमा : बापाकडून मुलीचा विनयभंग

नात्‍याला काळीमा : बापाकडून मुलीचा विनयभंग

Published On: Jan 20 2018 9:28PM | Last Updated: Jan 20 2018 9:27PM



नाशिकरोड : वार्ताहर

अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई रात्री जेवण झाल्यानंतर शेजारच्या घरात गेली होती. त्यावेळी पीडित मुलगी  आणि तिचे वडील घरात होते. आई बाहेरुन घरात आली त्‍यावेळी मुलगी रडत असल्याचे लक्षात आले. आईने मुलीला रडण्याचे कारण विचारल्‍यानंतर  पप्पा माझ्यावर अत्याचार करीत होते, असे मुलीने उत्तर  दिले. मुलीच्या आईने याबाबत पतीला जाब विचारला त्यावेळी पतीने उडवा उडवीचे उत्तरे देत शिवीगाळ केली. यावेळी आईने जवळच राहत असणाऱ्या सासु, दिर, भावजई यांना घडलेला प्रकार सांगितला. सर्वांनी समजूत घातल्यानंतर आपले पती पुन्हा असा प्रकार करणार नाही त्यामुळे मुलीच्या आईने पोलिसांना तक्रार केली नाही. मात्र, पुन्हा २० जानेवारी रोजी सकाळी विनय भंगाचा प्रकार घडला. 

पीडित मुलीच्या आईने पतीकडे याबाबत विचारणा केली त्यावेळी पतीने मुलीला झोपेच्या गोळ्या दे, असे सांगून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आईने याबाबत नाशिकरोड पोलिसांना तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.