Tue, Nov 19, 2019 02:30होमपेज › Nashik › भीषण अपघातात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू

भीषण अपघातात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू

Published On: Jan 18 2019 2:09PM | Last Updated: Jan 18 2019 4:31PM
नांदगाव(नाशिक) : प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील कोकणखेडे शिवारात चांदवड मनमाड रोडवर राणमळा शिवारात  शुक्रवारी (ता.१८ )सकाळी अकरा वाजुन पंधरा मिनिटांने दुचाकी व कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षीय मुलासह आई वडिलांचाही मृत्यू  झाला. या अपघातात ज्ञानेश्वर हरिभाऊ सोनावणे (वय ४१), मुलगा गौरव (५)  हे दोघे पिता- पुञ जागीच ठार झाले. पत्नी आशाबाई सोनवणे ( ३५)  या गंभीर जखमी झाल्या होत्‍या. 

आशाबाईंना उपचारासाठी नाशिक ग्रामीण रुग्नालयात हलविण्यात आले होते. आशाबाई यांचा दुपारी २.३० ला उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची माहिती त्यांचा पुतण्या शरद मांगीलाल सोनवणे यांनी दिली. तिघेही दुगाव तालुका चांदवडचे रहिवासी आहेत. माता पित्‍यासह मुलाच्‍या मृत्‍यूमुळे दुगाव येथील सोनावणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.