Sun, Jun 07, 2020 11:26होमपेज › Nashik › कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या 

कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या 

Published On: Jul 03 2019 10:07PM | Last Updated: Jul 03 2019 10:07PM
जळगाव : प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील पिळोदो येथील लोटन रामराव पवार (वय 35) आणि सुनीता लोटन पवार (वय 33) या शेतकरी दाम्पत्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजता ही घटणा घडली. 

पवार कुटुंबीयांवर राष्ट्रीयकृत बँक, पीक विकास सोसायटी आणि खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्याकडे आठ बिघे जमीन होती, दोन वर्षापासून सततच्या नापिकीमुळे ते अधिक कर्जबाजारी झाले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत, मोठा मुलगा आठवीला तर लहान मुलगा चौथीला आहे. वयोवृध्द आई व दोन विधवा बहिणीची जबाबदारी लोटन पवार यांच्यावर होती.