Fri, Jun 05, 2020 05:25होमपेज › Nashik › सटाणा : बिबट्‍याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

सटाणा : बिबट्‍याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

Published On: Jul 04 2019 1:19PM | Last Updated: Jul 04 2019 1:43PM
सटाणा : प्रतिनिधी 

सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथे गुरुवारी (दि.४) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भुतसिंग सोनू पवार या शेतकऱ्यावर देवळाणे शिवारातील शेतात अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, पुढील उपचारांसाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ते इंदिरा काँग्रेसचे किसान सेलचे तालुकाध्यक्ष रवी पवार यांचे काका आहेत. वनविभागाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे व सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी रुग्णाची विचारपूस केली. तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये रोख देवून पुढील मदत लवकरच करण्यात येईल असे त्‍यांनी सांगितले आहे. हल्ला झाला त्या ठिकाणी पिंजरा पाठविण्यात आला आहे. यावेळी वनरक्षक ममता बोडके, रुपाली राठोड, इजाज शेख आदी उपस्थित होते.