Fri, Jun 05, 2020 04:12होमपेज › Nashik › नाशकात पूर परिस्थितीमुळे १४४ लागू 

नाशकात पूर परिस्थितीमुळे १४४ लागू 

Published On: Aug 04 2019 2:59PM | Last Updated: Aug 04 2019 3:03PM

संग्रहित छायाचित्रनाशिक : प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कोणतीही जिवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  पुर परिस्थितीच्या अनुषंगाने पूलावर,  नदी किनारी, धबधब्याचे ठिकाणी सेल्फी काढणे, पुरात पोहणे, पुर पाहण्यासाठी गर्दी करणे, त्याचबरोबर प्रशासनाची मदत पोहचण्यास अडथळा होईल अशी कृती करणे, हुल्लडबाजी करणे, धोकादायक वाड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी प्रशासनकडून हलाविताना प्रशासनास विरोध करणे यामुळे जिवित तसेच वित्तहानी होऊ शकते म्हणून नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. 

सदर आदेशाचा  भंग करण्याविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करून करवाई करण्यात येईल या बाबत सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.