Tue, Jun 02, 2020 13:27होमपेज › Nashik › सभापतिपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज

सभापतिपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज

Published On: Jul 04 2019 2:02AM | Last Updated: Jul 03 2019 11:02PM
नाशिक : प्रतिनिधी

प्रभाग समिती सभापतिपदासाठी बुधवारी (दि.3) नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात नाशिकरोड, नाशिक पूर्व, सिडको आणि पंचवटी प्रभागासाठी केवळ एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या चारही प्रभाग सभापतींची बिनविरोध झाली असून, केवळ आता घोषणा होणे बाकी आहे.

उमेदवारी अर्ज दाखल होण्यासाठी बुधवारी (दि.3) दुपारी 2 पर्यंत मुदत होती. त्यानुसार नाशिकरोडसाठी भाजपाचे विशाल संगमनेरे, नाशिक पूर्वसाठी सुमन भालेराव, सिडको प्रभागासाठी दीपक दातीर तर पंचवटी प्रभागासाठी सुनीता पिंगळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. अन्य एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज या चार प्रभाग सभापतिपदांच्या उमेदवारीसाठी दाखल झाले नाहीत. यामुळे बिनविरोध निवड झाली असून, त्याबाबत आता फक्त घोेषणा होणे बाकी आहे. सातपूर आणि पश्‍चिम प्रभागासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. यातील सातपूर प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेचे संतोष गायकवाड आणि भाजपच्या हेमलता कांडेकर यांचे अर्ज दाखल झाले असून, शिवसेनेने गायकवाड यांच्यासाठी ही जागा सोडण्याची मागणी भाजपाकडे केली आहे. तसेच पश्‍चिम प्रभागासाठी काँग्रेसच्या वत्सला खैरे व मनसेच्या वैशाली भोसले यांनी अर्ज दाखल केले आहेत. भोसले या सध्या विद्यमान सभापती आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर मनसे आणि आता पुन्हा कुणाला संधी मिळते याकडे लक्ष लागून आहे.