Mon, Nov 18, 2019 09:08होमपेज › Nashik › धुळे : शिरपूर तालुक्यातील फतेपूर मातीचे धरण फुटले(video)

धुळे : शिरपूर तालुक्यातील फतेपूर मातीचे धरण फुटले (video)

Published On: Aug 09 2019 6:45PM | Last Updated: Aug 09 2019 6:45PM

धुळे : शिरपूर तालुक्यातील फतेपूर मातीचे धरण फुटलेधुळे : प्रतिनिधी 

शिरपूर तालुक्यातील फतेपूर मातीचे धरण फुटले आहे. यामुळे अरुणावती नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. यात करवंद गावाजळ करवंद-लौकी रस्त्यावरील पूल, शिरपूर शहरातील आमरिशभाई पटेल यांच्या जनकव्हीला निवासस्थानाजवळील लहान पूल, तसेच शिरपूर शहरातील खंडेराव मंदिर, शनि मंदिराजवळील पूल (यामुळे खर्दे मार्गे वाहतूक प्रभावित) आणि बाळदे  गावजवळील अरुणावती नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याची माहिती मिळाली आहे. नदीच्या मोठ्या पुरामुळे शिरपूर शहरात पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून बाजारपेठेतील दुकाने खाली करण्यात येत आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील बसफेऱ्या बंद करण्‍यात आल्या आहेत. ग्रामीण शालेय फेऱ्या बंद आहेत. तसेच धुळे ते साक्री, नवापूर व सुरतकडे जाणाऱ्या फेऱ्या बंद केल्या आहेत. शहादा ते धुळे मार्गावरील फेऱ्या पूर्णपणे बंद करण्‍यात आल्‍या आहेत. दोंडाईचा ते सुरत आणि दोंडाईचा ते साहूर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. साक्री ते नाशिक मार्गावरील बसेस बंद केल्या आहेत. वापी येथे अडकलेल्या बसेस पिंपळनेर ते चरणमाळ मार्गाने बोलावण्यात आल्या आहेत. हा एकमेव मार्ग सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होणार आहे.