Mon, Jan 25, 2021 15:47होमपेज › Nashik › उपायुक्तांच्या निवासस्थानावरील ठिय्या मध्यरात्री मनपा मुख्यालयात

उपायुक्तांच्या निवासस्थानावरील ठिय्या मध्यरात्री मनपा मुख्यालयात

Published On: Nov 06 2018 1:47AM | Last Updated: Nov 06 2018 1:47AMमालेगाव : प्रतिनिधी

ठेकेदारांना योग्य चौकशीअंती कोट्यवधींची बिले अदा केल्याचे, लेखी तीन तास उलटूनही देऊ न शकलेल्या महापालिका प्रशासनाने बोगस कामांसंदर्भातील आरोपाला बळ दिले. लोकप्रतिनिधींचा अपमान करण्याचा हा प्रकार सोक्षमोक्ष लावल्याखेरीज माघार न घेण्याचा गर्भीत इशारा देत आमदार आसिफ शेख समर्थकांसमवेत उपायुक्तांच्या निवासस्थानापासून उठून महापालिका मुख्यालयासमोर डेरेदाखल झाले. मध्यरात्रीच्या या घडामोडीमुळे मनपाजवळ एकच गर्दी होऊन पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला.

संशयास्पद विकासकामांच्या कोट्यवधी रुपयांच्या बिल देण्याला आक्षेप घेत आमदार शेख यांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजता कर उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या निवासस्थानासमोर सुरू  केलेले ठिय्या आंदोलन मध्यरात्री नंतरही ठोस लेखी खुलासाअभावी कायम होते. उपायुक्तांवर तोंडसुख घेत आंदोलक संतप्त झाले. अधिकारी अंतर्गत चर्चेत वेळ घालवत असल्याचा प्रकार वाद चिघळण्यास कारणीभूत ठरला.