Mon, Jan 25, 2021 05:57होमपेज › Nashik › तलवार घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक 

तलवार घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक 

Published On: May 14 2018 4:20PM | Last Updated: May 14 2018 4:20PMनाशिक : प्रतिनिधी

तलवार घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.  सोनु ऊर्फ डीचक दौलत जाधव (वय, 21रा जोशीवाडी सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्‍या गुन्हेगाराचे नाव आहे. आज(१४ मे) पहाटे पोलिस पेट्रालिंग करत असताना ही कारवाई करण्यता आली.  

औरंगाबाद येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने  पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या आदेशाने सहाय्याक पोलिस निरीक्षक लोखंडे, भगवान शिंदे , प्रविण गुंजाळ,विनोद टिळे हे पोलिस कर्मचारी सिन्नर शहरात खाजगी वाहनाने पेट्रोंलिग करत असताना  गोंदेश्वर रोड, जोशीवाडी येथे पहाटे ४ वाजून ४५ मीनिटांच्या सुमारास एक व्यक्‍ती संशयितरीत्या  हातात काहीतरी वस्तु घेऊन फीरत असताना आढळून आला. पोलिसांनी तात्‍याकडे चौकशी करण्याचा प्रयत्‍न केला असताना तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिस पथकाने  पाठलाग करुन त्याला गोंदेश्वर मंदीराच्या पाठीमागे पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 28ईंच लाबींची लोखंडी धातुची तलवार मिळून आली. 

जाधव याच्यावर सिन्नर पोलिस ठाण्यात बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयान्वये तसेच अदखलपात्र स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच त्‍याच्यावर CRPC 151 (3) प्रमाणे कारवाई करन्यात आलेली होती. न्यायालयाने त्याला दहा दीवस न्यायालयीन कस्टडीत  ठेवन्याचे आदेश दीलेले होते. जाधव हा नाशिक मध्यवर्ती काराग्रहातून जामीनावर सुटुन आल्यानंतर काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्‍याला अटक केल्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

याबाबत सिन्नर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.