Fri, Jun 05, 2020 15:37
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › सेनगाव ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाच प्रकरणी गुन्हा

सेनगाव ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाच प्रकरणी गुन्हा

Published On: Feb 25 2019 8:44PM | Last Updated: Feb 26 2019 1:18AM
हिंगोली : प्रतिनिधी

अवैधरित्या दारूची विक्री करू देण्यासाठी लाच मागितल्यावरून सेनगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर सोमवारी (दि.25) गुन्हा नोंदविण्यात आला. रहीम शेख असे आरोपीचे नाव आहे.

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी- साखरा रोडवरील बोरखडी फाटा येथे एकास अवैधरित्या दारू विक्री करू देण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रहीम शेख याने दीड हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातून एक हजार शेख घेणार होता तर पाचशे रूपये बीटमध्ये कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी पठाण यांना देण्यात येणार होते. लाचेच्या रक्कमेसाठी रहीम शेख हा तक्रादाराकडे तगादा लावून त्रास देत होता. त्यामुळे तक्रारदाराने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने रहीम शेख यांच्या विरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुरनं 34/ 2019 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 2018 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.