Wed, Jun 03, 2020 21:54होमपेज › Nashik › जळगाव : सुप्रीम कंपनीच्या २७ जणांविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव : सुप्रीम कंपनीच्या २७ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Last Updated: Feb 18 2020 7:47PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

जळगाव येथील सुप्रीम कंपनीचे चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, सी.ए. व अधिकारी अशा एकूण २७ जणांविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कंपनी कायद्याचे उल्लंघन करुन खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करुन कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाचा :बारावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा मार्ग मोकळा

प्रमोद बालकिसन मंत्री (४९, रा.शिवराणा नगर, जळगाव) हे सुप्रीम कंपनी मध्ये १९९५ ते २०११ कामाला होते. ज्यावेळेस येथे कामावर लागले तेव्हा ते सुपरवायर पदावर लागले होते. याकाळात पदोन्नती घेऊन गुणवत्ता विभाग मध्ये गुणवत्ता अधिकारी या पदापर्यत काम केले. या काळात किमान वेतन, शासनाकडे जमा करावयाची प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युटी, बोनस व निवृत्ती वेतन यात खोटे व बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासविल्याचा आरोप आहे. 

वाचा :ओझर, त्र्यंबक येणार नाशिक  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत

याप्रकरणी सुप्रीम इंडस्ट्रीजचे चेअरमन बी.एल.तापडिया, का. संचालक एम.पी.तापडिया, वरिष्ठ उपाध्यक्ष जे.एम.तोतला, संचालक एस.जे.तापडिया, व्हि.के.तापडिया, बी.व्ही.भार्गव, ई.बी.देसाई, एच.एस.पारेख, एन.एस.खंडेलवाल, एस.आर.तापडिया, वाय.पी.त्रिवेदी ( सर्व रा. सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड गट ११६१, ११६२ घाटकोपर लीक रोड, अंधेरी, मुबई ईस्ट) यांच्यासह महाव्यवस्थापक जी.के. सक्सेना, संजय यशवंत प्रभुदेसाई, व. महाव्यवस्थापक शकील अहमद शेख, व्यवस्थापक ए.एस.मुळे, सतीश भगीरथ सोमानी, सुरेश मंत्री, अनिल काशिनाथ काबरा, राजू कोठारी, अतुल लठ्ठा, मनिष पाठक, महेश एम.पाटील, अशोक मोगरे, जितेंद्र बडगुजर, जे.एच.चौधरी व एच.एन.जैन आदी. यांनी कायद्यान्वये मिळायला पाहिजे असलेल्या किमान वेतन शासनाकडे जमा करायची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम निवृत्तीनंतरच्या मिळणारे वेतन बद्दल हाणी गेले बनावट दस्तावेज म्हणून कामगार व शासनाची फसवणूक केली ५१०९४५ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रमोद बालकिसन मंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

वाचा :माउली मल्टिस्टेट फसवणूक; सुनील आडके यांना अटक