Tue, Sep 22, 2020 05:47होमपेज › Nashik › मालेगाव : सामान्य रुग्णालयात आमदारांसमक्ष वैद्यकीय अधीक्षकांना धक्काबुक्की

मालेगाव : सामान्य रुग्णालयात आमदारांसमक्ष वैद्यकीय अधीक्षकांना धक्काबुक्की

Last Updated: Mar 26 2020 9:40AM
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर सक्रिय करण्यात आली असताना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मालेगावच्या सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांना धक्काबुक्की झाली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समक्ष त्यांच्या समर्थकांनीच केली. त्यामुळे संतप्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडत हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली. वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पाऊणे नऊ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अधिक वाचा : नाशिक परिसरात विजेचा खेळखंडोबा

न्यायालयीन आदेशानुसार सामान्य रुग्णालयात उपचारार्थ संशयित आरोपी रुग्ण दाखल आहे. त्याची प्रकृती सुधारली असूनही डिस्चार्ज दिला जात नसल्याचा काही राजकीय व्यक्तींनी आक्षेप घेतला, त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. एका सूत्राने दिलेली माहिती अशी, सायंकाळी आमदार मुफ्ती समर्थकांसह रुग्णालयात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना थेट जाब विचारण्यात आला. पंधरा ते वीस वेळा कॉल करुन ही प्रतिसाद दिला नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. एका विशिष्ट रुग्णाला दाखल ठेवल्यावरुन वाद घालण्यात आला. त्यातच डॉ डांगे यांना धक्काबुक्की होऊन अतिरेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर आरोग्य कर्मचारी यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर आंदोलन करिता कामबंद केले. पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून चर्चा केली जात आहे. जोपर्यंत पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी येऊन सुरक्षेच्या दृष्टीने आश्वस्त करिता नाही तोपर्यंत काम न करणाऱ्या इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा : जिल्ह्यात ठिकठिकाणी बेमोसमी पावसाचे थैमान

आमदार मुफ्तींसमोर डॉ डांगे यांना शिविगाळ व धक्काबुक्की झाली. तरी त्यांना अडविले नाही. नेहमीच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात, दहशतीचे वातावरण असते. याविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशा भावना डॉ महाले यांसह इतरांनाही व्यक्त केल्या.

 "