Mon, Jul 06, 2020 22:22होमपेज › Nashik › '... म्हणून राज ठाकरेंना मोदींचा खूप राग येतोय'

'... म्हणून राज ठाकरेंना मोदींचा खूप राग येतोय'

Published On: Apr 27 2019 7:19PM | Last Updated: Apr 27 2019 7:19PM
नाशिक : पुढारी ऑनलाईन

जवळपास मागील दीड एक महिन्यापासून सुरू असलेला राज्यातील प्रचाराचा तोफा आज पूर्णतः थंडावल्या. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी उर्वरित १७ जागांसाठी सुरू असलेला प्रचाराचा धडाका, कॉर्नर सभा, रोड शो आणि शक्तीप्रदर्शनाने दणाणून गेला. येत्या २९ एप्रिल लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 

अधिक वाचा : राज्यातील प्रचाराचं वादळं अखेर शमलं; अखेरच्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान 

आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. ठाकरे यांच्याकडून सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरेंना नरेंद्र मोदी यांनी पछाडले आहे. नोटाबंदीमुळे आजवर जोरात सुरू असलेले राज ठाकरे यांचे दुकान बंद झाल्याने राज ठाकरेंचा पंतप्रधानांवर राग आहे. 

आमची कुठेच शाखा नाही
एक आमदार होता, तोही शिवसेनेत गेला. आता मनसे फक्‍त नावाला उरला आहे कारण आमची कुठेच शाखा नाही आणि उमेदवारही नाही, अशी अवस्था मनसेची झाली आहे. नाशिकमध्ये इतके चांगले काम केले मग नाशिककरांनी तुम्हाला घरी का बसवले, असा प्रतिप्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना विचारला. इथली कामे भाजपा- शिवसेना युतीच्या राज्य सरकारने दिलेल्या पैशातून उभी राहिली आहे, हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. 

अधिक वाचा : 'इंजिन बंद...घड्याळाचे बारा वाजून भुजबळही जेलमध्ये जातील' 

दोन हजार कोटी राज्याने दिले 
शुक्रवारी (दि.26) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी नाशिक मनपात सत्ता असताना केलेल्या विकासकामांचे व्हिडिओ दाखविले होते. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले कुंभमेळ्यांतर्गत झालेल्या विकासकामांसाठी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला. याच निधीतून कामे होऊ शकली. महापालिकेकडे पैसा नसल्याचे कारण देत हेच राज ठाकरे त्यांचे 40 नगरसेवक घेऊन माझ्याकडे आले होते. त्यावेळी मनपा आर्थिक अडचणीत असल्याने मनपाचा हिस्साही राज्याने द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली.